
पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्याकडून मिर्या बंदर जेटीची प्रत्यक्ष पाहणी
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सडा मिर्या बंदर जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आज प्रत्यक्ष स्थळी जाऊन माहिती घेतली.
या वेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक इन्स्टीमेंट तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिकांच्या मागणीनुसार विकासकामांना गती देऊन या परिसरातील मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्याचा निर्धार मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी व्यक्त केला.




