दुबार मतदार दिसला तर त्याला.फोडून काढा, ; राज ठाकरेंनी दिला मनसे स्टाईल इशारा

आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने बोगस मतदानाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली तसेच त्यांनी दुबार आणि तिबार मतदार मतदान केंद्रावर आढळल्यास त्यांना फोडून काढा, असा थेट इशाराच यावेळी दिला.या मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली. यासभेत बोलताना राज ठाकरेंनी हा इशारा दिला.

…. त्याशिवाय वठणीवर येणार नाही
जो मतदार उन्हात उभा राहतो, आणि मतदान करतो त्याच्या मतदानाचा हा अपमान आहे. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा हे दुबार, तिबार मतदार मतदान केंद्रावर दितले तर त्यांना तिथेच फोडायचे… मतदार केंद्रावर बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हाती द्यायचे त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

राज ठाकरेंचा संतप्त सवाल
फक्त विरोधी पक्ष नाही तर भाजपसह सगळेच सत्तेतील पक्ष म्हणत आहे की दुबार मतदार आहेत. मग माहीत असून देखील म्हणतात की निवडणुका घ्या.. का घ्या कुणाला काय घाई आहे. आणखी एकवर्ष निवडणूक घेऊ नका असा काय फरक पडणार आहे, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.

…मग निवडणूका घ्या
एका आमदाराचा मुलगा सांगतो की मी 20 हजार मतदार आणले. नवी मुंबईच्या आयुक्ताच्या घरावर १३० लोक नोंदवले. परवा मी मशिनबद्दल बोललो. मतदार गोंधळलेले आहेत. आजचा मोर्चा हा राग आणि ताकद व्यक्त करण्याचा आहे. मतदान याद्या साफ करा आणि मग निवडणूका घ्या असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button