
चिपळूण तालुक्यात दोन दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू…
चिपळूण तालुक्यात दोन दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर अरूण अशोक राणे (मुळ तोंडली पिलवली, सध्या कापसाळ) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरूण राणे यांची पत्नी सोनाली राणेने २५ ऑक्टोबर रोजी मार्कंडी येथील रूग्णालयात बालिकेला जन्म दिला होता. त्यानंतर २६ रोजी या रूग्णालयातून सोनाली यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्या कापसाळ येथील घरी राहण्यास गेल्या. २७ रोजी रात्री नवजात बाळाला स्तनपान केल्यानंतर सोनाली झोपी गेल्या. २८ रोजी पहाटे ४.४५ च्या सुमारास सोनाली यांनी पती अरूण राणे यांना बाळाची हालचल होत नसल्याचे तसेच ते रडत नसल्याची माहिती दिली. त्यानुसार ते या बाळाला तत्काळ कामथे रूग्णालयात उपचारासाठी नेवून गेले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com




