
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेचे आ. भास्कर जाधव स्टार प्रचारक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. कोकणातील उबाठा शिवसेनेचे वजनदार नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची देखिल स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने ४० शिलेदारांच्या नावाची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे. हे. ४० शिलेदार राज्य पिंजून काढणार असून सेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. ही यादी ४० नावांची असून त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, आदेश बांदेकर, सुषमा अंधारे, किरण माने आणि शरद कोळी यांच्या नावाचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे, या यादीत खासदार संजय राऊत यांचेदेखिल नाव आहे. पण ते सध्या तब्येतीच्या कारणास्तव उपचार घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणार्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे.www.konkantoday.com




