
’साफयीस्ट’ कर्मचाèयांचे उपाेषण 5 दिवसांनी सुटले, आ. निकम यांची मध्यस्थी
गेल्या 5 दिवसांपासून गाणे-खडपाेली औद्यागिक वसाहतीतील साफयीस्ट कंपनीविराेधात कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपाेषण मंगळवारी आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीने सुटले. 201 कामगारांना 19 पासून कामावर घेतले जाणार असून 20 कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काेर्टात गेला आहे. दिवसभर अनेक वादग्रस्त घटना घडल्या. त्यानुसार पाेलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत दाेन दिवस काेंडून ठेवलेल्या 53 कामगारांची कंपनीतून सुटका करण्यात आली.
गेल्या महिन्यात कंपनीने काेणतेही कारण न देता 221 कामगारांना कामावरून कमी केल्याने कामगार व व्यवस्थापन यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर अनेक घडामाेडी घडल्यावर कंपनीने 163 कामगारांना कामावर घेतले. मात्र उर्वरित 58 कामगारांना कामावर घेतले नाही. त्यामुळे सर्वच 221 कामगारांनी 5 दिवसांपासून कंपनीसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले हाेते. मात्र तरीही कंपनी याची दखल घेत नव्हतीः त्यातच 6 कामगारांची 2 दिवसात प्रकृती खालावल्याने उपाेषणकर्ते, त्यांचे कुटुंबीय व सहभागी सहभागी ग्रामस्थांचा उद्रेक झाला हाेता. यातूनच गेल्या 2 दिवसांपासून कंपनीत काम करणारे कायमस्वरुपी असणाèया 53 कामगारांना दाेन्ही बाजूचे गेट बंद करून डांबून ठेवण्यात आले हाेते.www.konkantoday.com




