रेयांश बने याने स्केटिंग स्पर्धेत पटकावली तीन सुवर्णपदके, विशाखापट्टणम येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड…


विरार येथे नुकत्याच झालेल्या ३५ व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. स्यांश पृथा पराग बने याने तीन सुवर्णपदके पटकावली. विशाखापट्टणम येथे होणार्‍या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे.
कु. रेयांशने याआधीही गोवा, म्हैसूर, केरळ आणि कलकत्ता येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. केवळ ५ व्या वर्षी त्याने बेळगाव येथे सलग ९६ तास ण स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदविले ही अभिमानास्पद कामगिरी आहे. आजवर त्याने विविध स्पर्धांमध्ये ३६ सुवर्ण, १४ रौप्य आणि ८ कांस्य पदके पटकावली आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button