राष्ट्रवादीचे उमेदवार नौसीन काझींकडून विरोधकांच्या विकासकामांच्या दाव्यांचा पर्दाफाश

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, मतदानासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार आपापला प्रचार जोमाने करत आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) अधिकृत उमेदवार नौसीन काझी यांनी विरोधकांच्या विकासकामांबद्दल केलेल्या दाव्यांचा पुराव्यांसह पर्दाफाश केला आहे.
नळपाणी योजनेच श्रेय विरोधक कसे घेत आहेत आणि ही नळपाणी योजना उलट कशी दुय्यम दर्जाची आहे हे नौसीन काझी यांनी पुरावे सादर करून दाखवले. निधी आणून रस्त्यांचा विकास केला, विरोधकांच्या या दाव्याला प्रभागातील रस्त्यांची जी दुर्दैवस्था आहे ती पुराव्यानशी सादर करून दाखवले. तसेच टेनिस कोर्टचे जे काम चालू आहे ते येथील स्थानिक जनतेला त्याचा काहीच फायदा नाही या उलट जर तिथे व्यापारी संकुल उभारण्यात आले असते, तर येथील स्थानिक युवक व महिलांना रोजगार उपलब्ध झाला असता, असे त्यांनी सांगितले.

पवित्र दफनभूमीचा म्हणजेच कब्रस्तानाचा विषय निवडणुकीच्या काळामध्ये खोटा श्रेय घेण्यासाठी करणे हे योग्य नाही यासाठी कोणा एका व्यक्तीचे योगदान नाही आहे सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत, असे सांगतानाच अद्ययावत जिम बनवलेली आहे तर ती आहे कुठे आणि त्याचा येथील स्थानिक युवक काय लाभ घेत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडून प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकासाचा भरघोस निधी आणून प्रभागामध्ये विकासाची गंगा आणणार, असे नौसीन काझी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्थानिकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घड्याळ या निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button