रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची शक्यता धुसर, नगराध्यक्षपदावरून रस्सीखेच


नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती म्हणून भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही मित्र पक्षांनी एकत्र येवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रारंभिक निर्णय घेतला असला तरी नगराध्यक्षपदाच्या जागांवरून तिढा निर्माण झाला आहे. बुधवारी मुंबईत वरिष्ठ पातळीवर झालेल्या प्राथमिक चर्चेत शिवसेनेन सातपैकी चिपळूणसह तब्बल सहा नगराध्यक्षपदांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीची शक्यता धुसर बनत चालली आहे.
जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूणसह खेड या चार प्रमुख नगर परिषदांसह देवरूख, लांजा, गुहागर या नगर पंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबरला होत आहेत. यामध्ये नगराध्यक्षपद कोणत्या पक्षाला द्यायचे यावर अद्याप एकमत न झाल्याने उमेदवारांची अधिकृत घोषणा होवू शकलेली नाही. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांचा दबाव आणि मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेवून स्वतःच्या उमेदवारावर ठाम आहे. शिवसेना जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप व राष्ट्रवादीसोबत चर्चांमध्ये शिवसेना मागे हटण्यास तयार नाही. या पार्श्‍वभूमीवर महायुतीतून एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर स्वबळावर उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. यामुळे महायुतीचे उमेदवार निश्‍चित होईपर्यंत गोंधळाचे आणि अनिश्‍चिततेचे वातावरण कायम राहण्याची चिन्हे आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button