
रत्नागिरी जिल्हा बँक कर्ला शाखा दागिन्यांच्या अपहारप्रकरणी संशयितास जामीन
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत ५० लाख रुपयांचा अपहार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या नातमुचलक्यावर मुक्तता केली. अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके बौद्धवाडी) असे संशयिताचे नाव आहे. २२ ऑगस्ट रोजी अमोल याला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. कारागृहात असलेल्या अमोल याच्यावतीने जामीनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होता.
www.konkantoday.com




