
रखडलेल्या खेड-वेरळ सर्व्हिस रोड कामाला अखेर मुहूर्त सापडला
वेरळ येथील हॉटेल गणपती कृपासमोरील सर्व्हिस रोडसह अंतर्गत रस्त्यांची कामे गेल्या ४ वर्षापासून रखडल्याने अपघाताचा धोका कायम होता. याप्रश्नी उद्योजक ओंकार उसरे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत अखेर प्रशासनाला सर्व्हिस रोडच्या कामासाठी मुहूर्त मिळाल्याने वाहनचालकांसह पादचार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वेरळ येथील हॉटेल गणपती कृपा समोरील रस्त्यावर वाहनचालकांसह पादचार्यांची सतत वर्दळ सुरू असते. याच हॉटेललगत असलेल्या लोकवस्तीमुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र गेल्या ४ वर्षापासून येथील चौपदरीकरणातील सर्व्हिस रोडसह अंतर्गत कामे ठप्प होती. या ठिकाणी सूचना फलकांअभावी वाहनचालकांची फसगत होण्यासह प्रसंगी अपघातही घडत होते.www.konkantoday.com




