
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळमजे पुलाजवळ मुंबई-मालवण शिवशाही बस व सीएनजी ट्रकची धडक, एक ठार ,दहाजण जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कळमजे पुलाजवळ बुधवारी ( सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबई-मालवण शिवशाही बस (MH 09 EM 9074) आणि सीएनजी ट्रकची (MH 43 CK 3421) समोरासमोर धडक झाली.यात शाम सुंदर गावडे (वय ८५, रा. विक्रोळी, कन्या मोहरनगर, मुंबई) यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.
अपघाताचा जोर इतका भीषण होता की, शिवशाही बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचुर झाला. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर गावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातातील जखमींची नावे –
अंकुश चंद्रकांत मेस्त्री (५४), रा. आचरा, मालवण
शशिकांत शंकर तावडे (७२), रा. पन्हाळे, जि. रत्नागिरी
प्रशांत शशिकांत राजशिर्के (४०), रा. शिंदेवाडी-कोडमला, जि. रत्नागिरी
सुप्रिया सुधाकर मोरे (५५), रा. विक्रोळी, मुंबई
प्रतिभा प्रकाश नागवेकर (५९), रा. संगमनेर, जि. रत्नागिरी
आर्या अमित मयेकर (३८), रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
गायत्री अमित मयेकर (१३), रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अक्षता अनंत पोळवणकर (४०)
दीपाली तुकाराम मोकळ (३०), रा. आमटेम, जि. रायगड
आयशा अमित मयेकर (६), रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
ट्रकमध्ये सीएनजी असल्याने मोठी दुर्घटना टळली. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.




