भाजपकडून सहा उमेदवारांची नावे निश्‍चित, मात्र अधिकृतरित्या भाजपकडून यादीची घोषणा नाही


रत्नागिरी नगर परिषद निवडणूक शिंदे शिवसेना व भाजप यांची महायुती लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेने आज सायंकाळी पत्रकार परिषद घेवून आपल्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र भाजपच्यावतीने उमेदवार निश्‍चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तरी प्रत्यक्षात अधिकृतरित्या पत्रक काढून किंवा पत्रकार परिषद घेवून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारांची पहिली यादी निश्‍चित करण्यात आली आहे. सहा जणांच्या यादीत चार जुन्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. तर दोन नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाचे अनुभवी नगरसेवक मुन्ना चवंडे यांना अद्याप तरी पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.
भाजपने जाहीर केलेल्या सहा जणांच्या यादीत मानसी करमरकर, वर्षा ढेकणे, राजेश तोडणकर, नितिन जाधव, समिर तिवरेकर, आणि सुप्रिया रसाळ यांचा समावेश आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button