बेपत्ता व्यक्तींविषयी पोलीसांचे निवेदन


रत्नागिरी, दि. 25 ) : जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून चार व्यक्ती नापत्ता झाल्या असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नापत्ता व्यक्तींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राजाराम गणपत साळवी वय 80 वर्षे रा. वाकवली बौध्दवाडी, ता. मंडणगड येथून दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.30 वा.च्या सुमारात नापत्ता झाले आहेत. त्यांचे वय – 80 वर्षे, उंची 5 बाय 5, रंग – निमगोरा, चेहरा उभट, केस पांढरे , नेसणीस पोपटी रंगाचा टिशर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, स्मरणशक्ती कमी झालेली आहे.
बाल्या बारक्या मे-या, वय 46 वर्ष, मुळ रा. वंकास, पाटिलपाडा, ता. डहाणु. जि.पालघर कामानिमित्त रहाणार राजिवडा, जे.टी. येथ बोटीवर, हा नापत्ता झाला आहे. त्यांचा रंग – सावळा, उंची 5 फुट, डोळे काळे, केस काळे, नेसनिस शरीरबांधा मजबुत, चेहरा गोल, नाक पसरट, पांढ-या रंगाचा चेक्सचा फुल हाताचा शर्ट व काळया रंगाची फुल पॅन्ट आहे.
सुधर्शन श्रीधर शेट्ये वय-52 वर्षे रा.मुळ रा.वाकेड ता.लांजा जि.रत्नागिरी सध्या रा.ओजरखोल स्वाद हाँटेल समोर सुशांत विश्वनाथ कोळवणकर यांचे घरी भाडेने. ता.संगमेश्वर जि. रत्नागिरी हे दि. 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फुट ९ इंच, रंग-निमगोरा, बांधा-सडपातळ, केस पांढरे, डोक्याला दोन्ही बाजुने टक्कल पडलेले, डोळे काळे, नेसणीस-काळपट निळपट रंगाचा फुल हाताचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट, पायात काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या चप्पल , भाषा मराठी.
सलमा ताजद्दीन सय्यद, वय ५७ वर्ष, रा. बिल्डींग नं.०५, घर नं.२३३०, शेटयेनगर, ता.जि.रत्नागिरी येथून दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी नापत्ता झाल्या आहेत. उंची ५ फुट, बांधा मजबुत, रंग गोरा, चेहरा उभट, केस काळे, नेसणीस पांढ-या रंगाचा पंजाबी ड्रेस, त्याचेवर काळया पांढ-या रंगाची ओढणी, पायात काळया रंगाचे शुज, हनुवटीवर गोंदलेले आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button