
पावस रोडवरील कोहिनूर हॉटेलच्या मागे गांजा बाळगणार्या, सेवन करणार्यावर दोन जणांवर गुन्हा दाखल
गांजासदृश अमली पदार्थ बाळगणार्या व गांजाचे सेवन करणार्या संशयितांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. हॉटेल कोहिनूरच्या पाठीमागील बाजूला शहर पोलिसांकडून तर तोणदे येथे रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद मुफीद भाटकर (२५, रा. जामा मस्जिदजवळ, राजीवडा, रत्नागिरी) व साहिल भिकाजी आग्रे (२७, रा. हनुमानवाडी, तोणदे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ५ नाव्हेंबर रोजी रात्री १०च्या सुमारास कोहिनूर हॉटेलच्या मागे आई हॉ टेलसमोर मोहम्मद भाटकर याच्याकडे, गांजासदृश अमली पदार्थ ६ हजार ५०० रुपयांचे १२४ ग्रॅम वजनाचा विक्रीसाठी स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर संशयित साहिल आग्रे हा तोणदे येथील नवलाई मंदिराच्या बाजूने जाणार्या छोट्या रस्त्याच्या बाजूला वडाच्या (झाडाजवळ गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करत असताना सापडला. या प्रकरणी पोलीस हवालदार रोशन सुर्वे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com




