देवगड समुद्रात 10 वाव क्षेत्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ‌’भारद्वाज‌’ या परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई

देवगड समुद्रात 10 वाव क्षेत्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ‌’भारद्वाज‌’ या परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई करीत ही नौका जप्त केली. ही नौका कर्नाटक येथील अशोक गोपाल सालिन (रा.मल्लपी- कोडूवूर, जि. उडपी) यांच्या मालकीची आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 10.45 वा. च्या सुमारास करण्यात आली. नौका कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आली आहे.देवगडचे सहा. मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे हे पोलिस कर्मचारी श्री. पाटील तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक यांच्ा पथकासमवेत देवगड समुद्रात शनिवारी रात्री नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड किनाऱ्या समोर सुमारे 10 वाव खोल समुद्रात एक नौका मासेमारी करताना दिसून आली. या पथकाने नौके जवळ जात परवाना कागदपत्रांची मागणी केली असता, खलाश्यांकडे महाराष्ट्र सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने ही तात्काळ ही नौका ताब्यात घेत कारवाईसाठी देवगड बंदरात आणली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button