
चिपळूण नगर पालिका निवडणुकीत रऊफभाई वांगडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या नावाला पाठिंबा
चिपळूण नगर पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून प्रत्येक प्रभागातून इच्छूक उमेदवारांची नावे समोर येत आहेत. अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी नगराध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज इच्छूक आपली तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रऊफभाई वांगडे यांच्या नावाला सामाजिक कार्यकर्ते सलिम आदम कास्कर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यांना सर्वसमावेशक पसंती मिळत असल्याचे सांगितले.www.konkantoday.com




