खेड रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेवून सोन्याची बांगडी चोरणार्‍या दोघा आरोपींना मुंबई लोहमार्ग पोलिसांनी केली अटक, माल हस्तगत


खेड येथे गावी आलेल्या फिर्यादी सौ. रंजना वामन पालंडे (६९, रा. दहिसर मुंबई) या ११.०९.२०२५ रोजी दुपारी ३.२० वा. खेड रेल्वे स्टेशन फ्लॅटफॉर्म क्र. १ वर आलेल्या सावंतवाडी दिवा या गाडीच्या डी-३ कोचमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या हातातील सोन्याची बांगडी त्यांचे नकळत लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली होती. या गुन्ह्याकामी मुंबई नेरूळ युनिटचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसी फुटेजच्या आधारे व बातमीदारांच्या आधारे तपास करीत असताना १२.१०.२०२५ रोजी सदरचा गुन्हेगार आरोपी इसम अभिजित पवार हा पनवेल रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याचे विश्‍वसनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पनवेल रेल्वेस्टेशन आरोपी अभिजित पवार (२७, रा. अंबरनाथ) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस कस्टडीत घेण्यात आल्यानंतर तपास करून सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र आरोपी निलेश गायकवाड (रा. अंबरनाथ) या दोघांनी संगनमताने केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींकडून चोरीला गेलेल्या १ लाख ४५ हजार रुपयांचे १४ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हस्तगत करण्यात आली. ही कामगिरी श्री. एस एम राकेश कलासागर पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई श्रीमती सुनिता ठाकरे-साळुंखे, पोलीस उपायुक्त पश्‍चिम परिमंडल लोहमार्ग मुंबई श्रीमती प्रज्ञा जेडगे, पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबई राजेंद्र रानमळे, स.पो.वा. लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुनील लोणकर पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सावंत, पोलीस हवालदार विकास नलगे, सुनील खोत, जनार्दन पुलेकर, रणजीत रासकर, अतुल धायडे, सुरेश येल्ला, इम्रान शेख, प्रशांत रेडकर, सुनील मागाडे, पोलीस शिपाई स्वप्नील नागरे, गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई व मंगेश खाडे रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button