
कोकण मार्गावर चालवण्यात येत असलेली एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर रोजीच्या फेरीनंतर यार्डात विसावणार
कोकण मार्गावर चालवण्यात येत असलेली एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर रोजीच्या फेरीनंतर यार्डात विसावणार आहे. या साप्ताहिक एक्सप्रेसच्या फेर्यांना प्रतिसाद लाभत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.
एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावते. एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता तिरुवअनंतपूरम येथे पोहचते. परतीच्या प्रवासात दर शनिवारी स्पेशल तिरुवअनंतपूरम येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून तिसर्या दिवशी मध्यरात्री १ वाजता एलटीटीला पोहचते. २२ एलएचबी डब्यांची स्पेशल कोकण मार्गावर पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवी, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव स्थानकात थांबते. या एक्स्प्रेसमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यासही मदत होत आहे.www.konkantoday.com




