एसटीच्या नाथजल  पाण्याच्या बाटलीची ज्यादा दराने विक्री , प्रवाशांना बसतोय भुर्दंड*______________

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने नाथजल नावाने हे बाटलीबंद पाण्याची विक्री राज्यातील सर्वच एसटी बसस्थानकावर केली जाते; मात्र एका लिटरच्या बाटलीवर 15 रुपये छापील किंमत असतानाही विक्रेत्यांडून सर्रास 20 रुपयेप्रमाणे विक्री सुरू आहे.रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह अन्य बसस्थानकांवर 5 रुपये जादा आकारणी करून पाण्याची विक्री सुरू आहे.वर्षानुवर्षे असे सुरू असताना मात्र एसटी प्रशासनाच्यावतीने मात्र कारवाई होताना दिसत नाही. बाटलीबंद पाण्याच्या विक्रीतून एसटी महामंडळाच्या उत्पन्नाल आधार मिळण्याऐवजी याचा फायदा खासगी विक्रेत्यांनाच अधिक होत आहे. प्रवाशांना मात्र आर्थिक फटका बसत आहे.एसटी विभागाच्या वतीने नाथजल ही पाण्याची बाटली विक्री 2020 साली सुरू करण्यात आली. पाण्याच्या बाटलीवर 15 रूपये किंमत आहे. मात्र खासगी एजंट, किरकोळ विक्रेत कुलींगच्या नावाखाली 15 रुपयांची बाटली तब्बल 20 रूपयास विक्री करीत आहेत.राज्याच्या सर्वच आगारात असा सर्रास प्रकार सुरू असल्यामुळे 5 रूपये जादा आकारणीमुळे लाखो, करोडोंची उलाढाल या खासगी एजंटची होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button