
स्वच्छ पाणीपुरवठ्यासह ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
लोटे औद्योगिक वसाहतीतून सुटणार्या सांडपाण्यामुळे खाडी किनारी असलेल्या कोतवली गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याप्रकरणी कोतवली ग्रामस्थ आक्रमक झाले असून स्वच्छ पाणीपुरवठ्यासह ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सोमवारी सायंकाळी लोटे येथीलं एमआयडीसीच्या औद्योगिक भवनमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दिला.
दूषित पाणी संदर्भात सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी एमआयडीसीचे नियंत्रण कुलकर्णी, अधिकारी हळदणकर, सीईटीपीचे भूषण शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. कोतवली सरपंच अक्षता तांबे, सदस्य मंगेश तांबे, संगीता धापसे, सुनील सावर्डेकर, जाफर परकर, केतन पेवेकर, रुपेश पेवेकर, अंकुश पेवेकर, रुपेश जुवळे, नरेश जाधव, सचिन तांबे, राजेंद्र तांबे, प्रथमेश धापसे, प्रल्हाद धापसे, सुनील जाधव, सत्यवान जुवळे, सचिन जुवळे, वसंत जुवळे, रुपेश जुबळे, विनोद आंब्रे आदी ग्रामस्थांसमवेत बैठक झाली.
२०-२५ या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या. यामध्ये कोतवली गावाला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, गेल्या ०-२५ वर्षांपासून दूषित पाण्यामुळे शेती व फळबागांचे झालेले नुकसान भरून द्यावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांना उद्योगांकडून शैक्षणिक दत्तक योजना राबवावी, तसेच स्थानिकांना रोजगार द्यावा या मागण्यांबरोबरच शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला नाही किंवा सांडपाणी थेट सोडण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्ग्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.www.konkantoday.com




