मच्छी व्यावसायाला पावसाने पुन्हा ब्रेक लावला,रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यावधीची उलाढाल थांबली!


  • सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी वातावरण असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे असे असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यावधीची उलाढाल असलेला मच्छी व्यवसाय पुर्णत: ठप्प झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘मोंथा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे मच्छी व्यावसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच हा व्यावसाय ठप्प झाल्याने मच्छीचे दर ही चांगलेच वधारले आहेत. यामुळे खवैय्ये देखील नाराज झाले आहेत.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. कोकणातील बहुतांश मासेमारी व्यावसाय ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

मुंबईच्या हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्या पर्यत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आणखीन काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. ‘मोंथा’ या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान चांगलेच बिघडले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्र देखील खवळलेला आहे. परिणामी, रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागांत मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस गेल्या काही दिवसा पासून हजेरी लावत आहे.

आता या पावसाचा फटका मच्छी व्यावसायाला देखील बसला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, जयगड, गुहागर, दापोली व राजापूर येथील मच्छीमारी व्यावसाय ठप्प झाला आहे. १ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या मच्छी व्यावसायाला पावसाने पुन्हा ब्रेक लावला आहे. यामुळे जिल्ह्यातील मच्छी व्यावसायातुन होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल पुर्णत: थांबली आहे.

मच्छीमारी थांबल्याने माशांचे बाजारातील दर ही गगणाला भिडले आहेत. मच्छी व्यावसायाला पावसाचा फटका बसल्याने मच्छी व्यावसायिकांना कामगारांचे पगार काढणे व घर चालविणे देखील अवघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button