
नामकरण झालेल्या नवजात बालकाचा आकस्मित मृत्यू
घरात बारशाचा कार्यक्रम पार पडून नवजात बालकाचे नामकरण झाले मात्र अचानक रात्री बालकाची प्रकृती बिघडल्याने त्याचा आकस्मित मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना रत्नागिरीत घडली आहे
या घटनेची खबर बाळाचे वडील अनिकेत प्रमोद नार्वेकर यांनी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत नार्वेकर यांच्या घरी मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नातेवाईकांनी एकत्र येऊन बाळाचे नामकरण ‘नीरव’ असे केले. रात्री बारशाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. यावेळी बाळ नीरव पूर्णपणे चांगला खेळत होता.
रात्री २ वाजण्याच्या सुमारास अनिकेत नार्वेकर यांच्या पत्नीने बाळ नीरव याला अंगावरील दूध पाजून त्याला घरातील बेडवर झोपवले आणि त्या शेजारी झोपल्या. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आईला जाग आली असता, त्यांनी पाहिले की बाळ नीरवचे अंग अचानक थंड पडले होते आणि त्याच्या नाकातून रक्त आलेले होते.
हा प्रकार पाहून घाबरलेल्या आईने त्वरित कुटुंबातील नातेवाईकांना याची माहिती दिली. बाळाला तात्यांनी रुग्णालयात नेण्यात आले परंतु सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले




