
दापोली येथे अवैधरित्या गौण खजिन्याची वाहतूक करणार्यांविरूद्ध कारवाई
दापोली येथे डंपरमधून अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक करताना दोघा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप रामचंद्र चौगुले (रा. कादिवली, दापोली) तसेच सेतुलाल राठोड (रा. कादिवली दापोली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील डंपरसह सुमारे २० लाख ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच दुसर्या एका प्रकरणात आरोपी सुनील चौगुले, संतोष कडू, संजय जाधव, यांच्यावर देखील विनापरवाना अनधिकृत गौण खनिजाची चोरटी वाहतूक केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून १२ लाख रुपये किंमतीचा डंपर तसेच १५ लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा, तसेच १५ लाख रुपये किंमतीचा डंपर व त्यामध्ये असलेली वाळू जप्त करण्यात आली आहे. याबाबत जालगाव येथील मंडल अधिकारी विनोद जाधव यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती
www.konkantoday.com




