
गणपतीपुळे समुद्रात पेण, रायगड येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरुच
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रात २६ ऑक्टोबर रोजी स्नानासाठी उतरलेला तरुण बेपत्ता झाला होता. चार दिवसांपासून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नितीन शंकर पवार (३५, अमरापूर, पेण, जिल्हा रायगड) असे या तरुणाचे नाव आहे.
नितीन पवार व त्यांचा मुलगा २६ रोजी सायंकाळी गणपतीपुळेत समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. नितीन व त्यांचा मुलगा आयांश समुद्राच्या पाण्यात गटांगळ्या खावू लागले. आयांशला वाचवण्यात यश आले तर नितीन हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. गणपतीपुळेतील जीवरक्षक ग्रामस्थ व जयगड पोलीस कर्मचारी नितीन यांचा शोध घेत आहेत.
www.konkantoday.com




