
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून भगव्या झेंड्याखाली निष्ठेची शपथ घेतली.
या प्रसंगी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं —
“कणकवली आणि शिवसेना हे समीकरण आजवर अखंड राहिलं आहे. राणे साहेबांनी निर्माण केलेलं ते शिवसेनेचं वैभव आज निलेशजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा परत येत आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही शिवसेना अधिक बळकट करू आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकवू.”
राजकारणातील संघर्ष आणि शिवसेनेच्या परंपरेची आठवण करून देत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं की —
“आता कारणं सांगायची नाहीत, काम करून दाखवायचं आहे. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे.”
या बैठकीस आमदार निलेश राणे, संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख व मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.



