
राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी द्वितीय
तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे तालुक्यातील डेरवण. येथील क्रीडा संकुलात झालेल्या ३५व्या कनिष्ठ राज्यस्तरीय – तायक्वांदो स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने सांघिक द्वितीय स्थान पटकावत उठावदार कामगिरी केली.
पुमसे दुहेरी प्रकारात भार्गवी पवार व योगराज पवार यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर साई सुवारे, श्रुती काळे, भार्गवी पवार यांनी सांघिकमध्ये रौप्य, वैयक्तिक क्रीडाप्रकारात साई सुवारेने कांस्यपदक पटकावले. तसेच फ्री स्टाईल पुमसे या प्रकारात गार्गी बाकलकर, तर सांघिकमध्ये साई सुवारे, दिव्या नागर, वेदांत देसाई, योगराज पवार यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. वैयक्तिकमध्ये तेजस ११ मसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मोरिशन भुवड, दिव्या गुरव, रुद्र नलगे यांनी रौप्यपदक मिळवत स्पर्धेत उठावदार कामगिरी केली.
राज्य संघटना महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे, राज्य संघटना कोषाध्यक्ष व्यंकटेश कर, जिल्हा संघटना सचिव लक्ष्मण कर, शशांक घडशी, संजय सुर्वे आदींनी पदकप्राप्त खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले.www.konkantoday.com




