
राजापुरात रेल्वेने येणार्या प्रवाशांचा प्रवास खड्ड्यातूनच
राजापूर रेल्वेस्टशन केळवली मार्गावरील ससाळे ते रेल्वेस्टशन व रेल्वेस्टेशन ते केळवली पर्यतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चाकरमन्यांचा राजापुरातील प्रवास धक्के खातच होत आहे. यामुळे नाराजी व्यक्त . करण्यात येत आहे.
राजापूर रेल्वेस्टेशन केळवली या रस्त्यावर ससाळे ते केळवली या रस्त्यावर बहुतांश ठिकाणी रस्ता उखडला गेला असल्याने खड्डे पडले – आहेत. यामार्गावरील राजापूर ते – ससाळे पर्यतच्या १० किमी रस्त्याचे काही ठिकाणी रुंदीकरण करीत डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र त्यापुढील ११ किमी रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. सोल्ये उतारावरील एक किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी उर्वरित रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. रेल्वेस्टेशन पूर्वेकडे केळवली तर पश्चिमकडे ससाळे पर्यतचा रस्ता खराब असल्याने येणार्या चाकरमन्यांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. रेल्वेस्टेशनच्या बाहेरील बाजूचे सुशोभिकरण करण्यात आले मात्र स्टेशनकडे जाणार्या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी जाणार्या प्रवाशांना धक्के खातच प्रवास करावा लागत आहे. केंद्र शासनाने रेल्वेस्टेशनपासून महामार्गपर्यंतचे रस्ते कॉंक्रीटकरण करण्याचे धोरण अवलंबविले असून यामध्ये राजापूर येथील रेल्वेस्टेशन ते मुंबई गोवा महामार्ग या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे.www.konkantoday.com




