
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालया ला केंद्र शासनाने विशेष सुविधा, तसेच स्वतंत्र दर्जा वाचनालयाच्या विकासा साठी द्यावा खासदार नारायण राणे यांचे कडे निवेदन सादर.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या वास्तूत प्रारंभीत झाल्यानंतर पहिल्यांदाच खासदार नारायण राणे यांनी वाचनालयाला सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी राणे साहेबांचे शाल श्रीफळ पुष्पकरंडक आणि मोदीजी चे पुस्तक देऊन दीपक पटवर्धन यांनी स्वागत केले.

खा. नारायण राणे साहेबांनी वाचनालयाची पाहणी केली आणि सुंदर वास्तू उभी केल्याबद्दल दीपक पटवर्धन यांचे कौतुक करत अभिनंदन केले. हे वाचनालय जुने आहे भरपूर ग्रंथ संपदा वाचनालयात आहे आता जागाही प्रशस्त आहे वाचकांनी या वाचनालयाचा भरपूर लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी दिपक पटवर्धन यांनी खासदार राणे साहेबांकडे ऐक निवेदन सादर केले त्या माध्यमातून २०० वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या वाचनालयातील ग्रंथ संपदेचे डिजिटायझेशन. तसेच हे वाचनालय आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी डिजिटल ऑनलाईन वाचनालय व्हावे म्हणून तांत्रिक सुविधा आवश्यक सेटअप या साठी ३ कोटी रुपयांची उपलब्धता केंद्र शासन अगर कंपनी सीएसआर माध्यमातून वाचनालयाला उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच या वाचनालयाची प्रदीर्घ वाटचाल ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन केंद्राने विशेष सुविधा, दर्जा द्यावा म्हणून प्रयत्न करावेत अशी विनंती निवेदन माध्यमातून. करण्यात आली.

या प्रसंगी सचिन करमरकर, मुन्ना चवंडे. उमेश कुलकर्णी, प्रवीण देसाई, सौ शिल्पा मराठे, सौ. मुग्धा पुरोहित , कर्मचारी वर्ग उपस्थित होता.





