रत्नागिरीच्या मिताली भिडे यांना भरतनाट्यम विषयात एम.ए. पदवी

ए प्लस ग्रेडसह प्रथम श्रेणी

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये प्रथमच भरतनाट्यमची कला रुजविण्याचा मान मिळवलेल्या आणि साईश्री नृत्य कला मंदिरच्या संस्थापिका सौ. मिताली भिडे यांनी अलीकडे डी. वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) येथून एम.ए. इन डान्स (Bharatanatyam) ही पदवी ए प्लस ग्रेड आणि प्रथम श्रेणी गुणांसह संपादन केली आहे.

गुरू स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या कठोर परिश्रमांच्या जोरावर मिताली भिडे यांनी रत्नागिरी-पुणे-रत्नागिरी असा सतत प्रवास करून दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या यशाबद्दल साईश्री परिवाराकडून तसेच त्यांच्या शिष्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

साईश्री नृत्य कला मंदिर ही संस्था गेल्या २६ वर्षांपासून रत्नागिरीत कार्यरत असून, या संस्थेतून अनेक विद्यार्थिनींनी विशारद पदवी मिळवली आहे. तसेच अनेक विद्यार्थिनींचे अरंगेत्रमही यशस्वीरित्या झाले आहेत. मिताली भिडे यांचा सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास आणि त्यांच्या अनुभवातून शिष्यांना मिळणारी प्रेरणा हीच साईश्री संस्थेच्या यशामागची खरी प्रेरक शक्ती ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button