
युवासेना जिल्हाप्रमुखपदी नव्याने निवड झालेले प्रसाद सावंत यांचा देवरुख येथे सत्कार
देवरुख : ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख पदी नुकतीच निवड झालेले प्रसाद सावंत देवरुख येथे आले असताना त्यांचा शिवसेना संगमेश्वर तालुका व युवासेनेतर्फे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, युवासेना राज्य सहसचिव प्रद्युमन माने, शहर प्रमुख दादा शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख तेजस भाटकर, युवासेना उपतालुकाप्रमुख संदेश घाग, युवासेना शहर प्रमुख अमर गवाणकर, पारस साखरे, निखिल जाधव, अजिंक्य कीर, तालुका सचिव प्रदीप ढवळ, संदेश जाधव, तनय चाळके, उमेश काळे, तेजस कांबळे, यश रसाळ, लखन कांबळे व शिवसैनिक उपस्थित होते.




