
बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना २०१४ विधी सेवा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन
रत्नागिरी, दि. 30 ) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने ग्रामपंचायत फुणगुस ता. संगमेश्वर येथे “बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना २०१४ ” व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पॅनल विधीज्ञ अमित अनंत शिरगावकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवा विषयी माहिती दिली तर सचिव आर. आर. पाटील यांनी बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना २०१४ व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव आर आर. पाटील तसेच सरपंच अशोक विठ्ठल पांचाळ, किरण गजानन भोसले, पोलीस पाटील प्रशांत सखाराम धुळ, ग्रा.पं. अधिकारी पोचरी अशोक सदाशिव भुते, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका तसेच फुणगुस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



