
प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, युवकचे नौसीन काझी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घेतली भेट
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घेतली भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे युवक अध्यक्ष नौसीन काझी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षतर्फे नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील ३२ वार्डसाठी ४० इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी नगराध्यक्ष महिला सर्वसाधारण उमेदवारीसाठी २ दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले.
या घडामोडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच वाय. बी. चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.
मुख्य म्हणजे महिला नगराध्यक्ष पदासाठी ज्या दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामध्ये बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी सौ. वहिदा बशीर मुर्तुझा यांनीही अर्ज भरलेला आहे. त्यामुळे या भेटींची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार होत आहे. बशीर मुर्तुझा हे शरद पवार यांचे एकनिष्ठ आणि अत्यंत जवळचे आहेत. त्यांचा रत्नागिरी शहरांमध्ये मोठे जनमत आहे, दुर्लक्षित करून चालणार नाही. या भेटी दरम्यान राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष नौसीन काझी हेही उपस्थित होते. त्यांनीही प्रभाग क्र. ४ कोकण नगर, कीर्ती नगर, क्रांतीनगर, स्टेट बँक कॉलनी, चर्मालय या भागातून इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे अर्जाद्वारे मागणी केलेली आहे. काझी यांचे या प्रभागामध्ये चांगला संपर्क असून, संपर्क कार्यालयामार्फत होत असलेल्या कामाची जोरदार चर्चा आहे. गतवर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांना या प्रभागातून भक्कम लीड मिळवून देण्यामध्ये काझी यांचा मोलाचा वाटा होता. या प्रभागातून काझी यांना उमेदवारी मिळाल्यास माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्याबरोबर त्यांचा “हाय व्होल्टेज” सामना पहायला मिळेल.
या सर्व घडामोडींचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष “हम भी किसीसे कम नही” असा संदेश राजकीय वर्तुळात देताना यशस्वी होत असताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुका या चुरशीच्याच होतील यामध्ये आता काही दुमत राहिलेले नाही.




