चिपळूणमध्ये डिसेंबरमध्ये ‘युवा साहित्य संमेलन’

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर महिन्यात खास युवकांसाठी ‘युवा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन घेण्यात येत आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामवंत लेखक, समीक्षक आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले माधव भांडारी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ लेखक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी स्वीकारली आहे.

वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी समितीच्या अध्यक्षपदी लोकप्रिय आमदार शेखर निकम, उपाध्यक्षपदी माजी आमदार रमेश कदम, उद्योजक प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, आणि चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले असून सर्वांनी संमेलनास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

लेखक माधव भांडारी यांनी ‘अयोध्या’ (मराठी व हिंदी), ‘१४ गारिबाल्डी स्ट्रीट’, ‘मागोवा दंतकथांचा’, ‘देश माझा, मी देशाचा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९’, ‘इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार’, ‘कलम ३७०’, ‘कुतुबमिनार’, ‘पाकिस्तानच्या निर्मात्यांचे काय झाले?’, ‘दृष्टीकोन’ अशा अनेक विचारप्रवर्तक ग्रंथांचे लेखन केले आहे.

संमेलनाच्या आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष संतोष गोनबरे, कार्याध्यक्ष धीरज वाटेकर आणि संमेलन समितीचे सदस्य यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button