
गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडी झाली मनसेमय
गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) जाहीर प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली वडद सुतारवाडी येथील ५० महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सुतारवाडी येथील सभागृहात उत्साहात झाला.
यावेळी मनसे वडद शाखेच्या अध्यक्षपदी प्राणेश पिंपळकर यांची, तर राजेंद्र पिंपळकर यांची उपशाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या दोघांनाही प्रमोद गांधी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
भव्य दिव्य पक्ष सोहळ्यास मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, सुजित गांधी सुशांत कोळंबेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी अजय पिंपळकर, दत्ताराम पिंपळकर, प्रसाद पिंपळकर, उमेश पिंपळकर, अजित पिंपळकर, प्रमोद पिंपळकर, अशोक पिंपळकर, उमेश पिंपळकर, वासुदेव पिंपळकर, वासुदेव, सचिन पिंपळकर, दीपक पिंपळकर, योगेश पिंपळकर, मानसी पिंपळकर, भाग्यश्री पिंपळकर, रेखा पिंपळकर, कल्पना पिंपळकर, आरोही पिंपळकर आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.




