खेडमध्ये चोरट्याने बंद घर फोडून सव्वा दोन लाखाचे सोन्याचे दागिने चोरले व घराचे कुलूपही चोरून नेले.

खेडमध्ये चोरट्याने बंद घर फोडून सव्वा दोन लाखाचे सोन्याचे दागिने चोरले व घराचे कुलूपही चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घरातून दागिन्यांसह लोखंडी कुलूप चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी घडली. चोरट्याने तब्बल २ लाख १८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरला आहे.या चोरीबाबत दादा महादेव देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते पत्नी व मुलांसमवेत शुक्रवारी दुपारी १:३० वाजण्याच्या दरम्यान घर बंद करुन बाहेर गेले होते. हे सर्वजण सायंकाळी ५:२२ वाजण्याच्या दरम्यान घरी आले असता त्यांना मुख्य दरवाजाचा कडी, कोयंडा तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता खोलीतील कपाटातील २ लाख १८ हजाराचे २ तोळे ८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसले. तसेच दरवाजाला लावलेले लोखंडी कुलूपही चोरट्याने नेले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button