
खेडमध्ये रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना रविवारी रात्री सुमारे ८:३० वाजता मौजे नातू तर्फ वावे परिसरात घडली.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे नातू तर्फ वावे येथे रेल्वे रुळांवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो जागीच मरण पावला होता. प्राथमिक तपासानुसार, संबंधित व्यक्ती कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली




