
अवकाळी पावसाचा रत्नागिरी जिल्ह्यातील भात पीकांना फटका
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्या पावसामुळे शेतकरी चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. कापून ठेवलेली भातपिके भिजून मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अनेक हेक्टर क्षेत्रातील भातपिकांना पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे भातपिके आडवी होत असल्याने भातकापणी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे.
गेल्या ४ दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरुच आहे. सकाळपासून निर्माण होणार्या ढगाळ वातावरणामुळे भातकापणी करायची कशी, असा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हजेरीने शेतकर्यांची तारांबळच उडत आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाऊस . हिरावून नेतोय की काय, या शक्यतेने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.




