रत्नागिरी तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील तरुणाचा विषारी द्रव प्राशनाने मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील तरुणाने विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाला. आदेश रत्नाकर गोनबरे (४६, रा. गोनबरेवाडी-रानपाट, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. आदेश गोनबरे याने अज्ञात कारणातून रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच दु. २ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button