प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील सुमारे ५०० कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपा प्रवेशावेळी खा. नारायण राणे यांनी उत्स्फूर्त स्वागत करत “पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील,” अशी ग्वाही दिली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रशांत यादव यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ते चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मंगळवारी चिपळूण येथे झालेल्या जनता दरबाराच्या निमित्ताने भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारसंघातील सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

या नव्या प्रवेशामध्ये कळकवणे, ओवळी, आकले, स्वयंदेव, नादिवसे, असुर्डे, दहिवली, पेढे, पाली, पाचाड, मालदोली, मार्गताम्हाणे, आंबतखोल, हडकणी धनगरवाडी, मिरजोळी, शिरगाव, गिमवी, कापरे, कालूस्ते, कोळकेवाडी, कान्हे, खडपोली, गाणे, दादर, नारदखेरकी, तिवडी तसेच संगमेश्वर-देवरुख परिसरातील कोंडीवरे, कोसुंब, कुचांबे, कुडवली, देवरुख, आंबवली आदी गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर पिंपळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश मोरे, कान्हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गंगाराम पवार, तसेच चिपळूण येथील ॲड. वासंती दाभोळे व ॲड. सुमित जोंधळे यांनी देखील या प्रवेश सोहळ्यात भाजपात प्रवेश केला.

या कार्यक्रमावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, सौ. सुप्रिया उतेकर, सौ. दीप्ती महाडिक, सौ. रुही खेडेकर, सौ. अंजली कदम, सौ. प्रणाली सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button