
खेड तालुक्यातील तरुणाचा विंचु चावल्याने उपचाराच्या दरम्यान मृत्यू
खेड तालुक्यातील एका ३५ वर्षीय तरुणाचा विंचूदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली गवत कापण्यासाठी शेतात गेलेल्या या तरुणाला विंचू चावला आणि उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अजय वसंत मोरे (वय ३५ वर्षे, रा. पोसरे, साडेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अजय मोरे हे गवत कापण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी त्यांना विषारी विंचवाने दंश केला. विंचूदंशाची घटना घडल्यानंतर त्यांना त्वरित कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अजय मोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, विष शरीरात जास्त प्रमाणात भिनल्याने उपचारांना यश आले नाही. अखेरीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अजय मोरे यांना मृत घोषित केले.




