आम्ही सत्तेत नाही म्हणून समोरची काही मंडळी आमची लोक चोरून नेत आहेत..

आमदार भास्कर जाधव यांची खंत

आपण सत्तेत नाही म्हणून समोरची काही मंडळी आमचे लोक चोरून नेत असल्याची खंत व्यक्त करतानाच आम्हाला उमेदवारांची वाणवा भासेल, असं वाटलं असतानाच तसं झालं नाही, उलट लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांमध्ये चीड आहे आणि हे काही राज्यकर्ते जे वागत आहेत ते लोकांना अजिबात मान्य नाही. त्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली.

राज्यातील निवडणुका ३१ जानेवारी २०२६च्या आत घ्या, असे आदेश कोर्टाने दिल्यानंतर राज्यातील सर्वच नेते निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव गेले चार दिवस गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.आज गुहागर शासकीय विश्रामगृह येथे गुहागरमधील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत असताना भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गुहागर नगरपंचायतीचे सुद्धा १७ वार्ड आणि एक नगराध्यक्ष असे १८ उमेदवार आम्हाला ठरवायचे होते. त्यांच्याही आज मुलाखती आम्ही घेतल्या आहेत आणि त्यांची नावे लवकरच आम्ही जाहीर करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी संतोष

रामगडे ही अतिशय उच्चशिक्षित मुलगी आहे. त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेला आहे. तिने अनेक कोर्स केलेले आहेत आणि स्वतः ती व्यावसायिक आहे आणि विशेष करून ती कुणबी समाजातील आहे. असा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे. यावेळी निवडणुकीला मी तयार आहे, असे सिद्धी रामगडे यांनी सांगितल्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रचंड जल्लोष केला. टाळ्यांचा कडकडाट करतानाच ती जिंकून आली म्हणून उपस्थितांनी तिचा हार तुरे देऊन सत्कारही केल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “आरक्षणाचे लॉट पडणार होते. रिझर्वेशन ठरणार होतं. त्याच वेळेला मी विक्रमला विचारलं, तू कुठून उभा राहणार. मागच्या वेळेला हा वॉर्ड ओपन पडला आता जिथून तो उभा राहतोय अंजनवेल गटातून तिथे. त्यामुळे तू चिपळूणला गटातून उभा राहा, तू कळंबट गटातून उभा रहा. नाहीतर मी दोन-तीन गटात मी तयारी केली होती; परंतु त्यांनी मला स्पष्ट सांगितले, “पप्पा मला जर संधी मिळाली, तर माझ्या गटातून आरक्षण खुले पडले, तर मी तिथून निवडणूक लढवेल. नपेक्षा ज्याच्या कोणाच्या गटामध्ये ती पडेल त्याचं मी काम करेन.” आणि शेवटी पक्षाचा एक माणूस वाढावा ही माझी इच्छा आहे; परंतु त्यांचा हा प्रामाणिकपणा मला वाटतं देवानं ऐकला. मागच्या वेळेला सुद्धा ती ओपन सीट पडली होती. मध्ये आरक्षण पडलं तेव्हा ओपन पडली होती आणि आता पुन्हा आरक्षण पडलं त्या वेळेलाही ती ओपन सीट पडली. त्यामुळे विक्रांत तिथून उभा राहणार.”

“माझ्यासमोर जे विधानसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले मनसेचे प्रमोद गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी मला भेटायला आले होते. आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका एकत्रित लढू, असा त्यांनी प्रस्ताव दिलाय, मला तो प्रस्ताव मान्य आहे. त्यांना मी म्हटलं की वास्तवाचं भान ठेवून आपण निर्णय घेऊया. वास्तव मागण्या आपण कोणी करूया नको. त्यांना ते मान्य आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर आमची आघाडी ही नक्की होणार, युती ही नक्की होणार मुळे त्यांच्याबरोबर बसल्यावरच उर्वरित नावे मी घोषित करणार”, असेही आमदार जाधव यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button