
मालवणी रंगभूमीला जागतिक ओळख मिळवून देणारे गंगाराम गवाणकर यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी वाहिली श्रद्धांजली
मालवणी रंगभूमीला जागतिक ओळख मिळवून देणारे, मराठी नाट्यक्षेत्रातील मानबिंदू गंगाराम गवाणकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
‘वस्त्रहरण’ सारख्या अजरामर नाटकातून त्यांनी मालवणी बोलीतील विनोद, कोकणातील माणसांचे भावविश्व आणि वास्तव जीवनातील अनुभवांना अत्यंत कलात्मकपणे लोकांसमोर आणले. त्यांच्या लेखनामुळे मालवणी संस्कृतीला आणि बोलीभाषेला नवे आयाम लाभले.
त्यांच्या निधनाने कोकणाने एक प्रतिभावंत लेखक गमावला असून मराठी साहित्य – नाट्यविश्वाची मोठी हानी झाली आहे
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
ॐ शांती
— डॉ. उदय सामंत
मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन




