
जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश काळ्या पवार (रा. पोमेंडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पोमेंडी बुद्रुक येथे घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रतिभा दिनेश देशमुख (वय ४८, रा. शंखेश्वर मधुबन अपार्टमेंट, बोर्डींग रोड, माळनाका, रत्नागिरी) या व संशयित यांच्या जमिन खरेदी-विक्री चे व्यवहारावरुन ओळख झाली होती. संशयित सुरेश पवार यांची मालकीची जमीन आहे असे फिर्यादी यांना सांगितले. त्यामध्ये १० गुंठे जमिनीचा व्यवहार ९ लाखाला ठरवून संशयिताने फिर्यादी यांच्याकडून टोकन म्हणून २० हजार घेतले. १० सप्टेंबर २०२३ ला जमिन खरेदी खताचे रजिस्ट्रेशन म्हणून ६० हजार व जमिन कंपाऊंड घालणे व डुरा बुजविणे ४० हजार असे एकूण १ लाख खर्च येणार असल्याचे संशयिताने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा खारेघाट रत्नागिरी या बॅंकेतून १ लाख रुपये २३ नोव्हेंबर २०२३ ला संशयित सुरेश पवार यांच्या अकाऊंटला जमा केले होते. त्यानंतर जमिन विक्री करिता फिर्यादी प्रतिभा देशमुख संशयिताला भेटण्यासाठी जात असता तो टाळा-टाळ करु लागला. १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रतिभा देशमुख यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




