
कोंडवी-चिंद्रवली येथील श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला ३१ ऑक्टोबरपासून सुरुवात
रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थान कोंडवी-चिंद्रवलीचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध दशमी (३१ ऑक्टोबर) ते कार्तिक वद्य प्रतिपदा (६ नोव्हेंबर) पर्यंत साजरा होणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवाला सहकुटुंब सहपरिवार, मित्रमंडळींसाह उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सतीश मुळ्ये यांनी केले आहे.
३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची शोडषोपचार पूजा आणि अभिषेक केला जाईल. रात्री ९.३० ते १ या वेळेत आरती, भोवत्या व हभप यश सोहनी यांचे कीर्तन होईल. १ नोव्हेंबर (स्मार्त एकादशी) रोजी
सकाळी ८ वाजता श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक व धार्मिक विधी होतील. सायंकाळी ४.३० वाजता भजन, रात्री ९.३० ते १ यावेळेत आरती, भोवत्या, दिंडी व हभप यश सोहनी यांचे कीर्तन होईल. २ नोव्हेंबर (भागवत एकादशी) रोजी सकाळी ८ वाजता श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक व धार्मिक विधी होतील. सायंकाळी ४.३० वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ९.३० ते १ यावेळेत आरती, भोवत्या, दिंडी व हभप यश सोहनी यांचे कीर्तन होईल. ३ नोव्हेंबर रोजी
सकाळी ८ वाजता श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक होईल. रात्री ९.३० ते १ यावेळेत आरती, भोवत्या व हभप यश सोहनी यांचे कीर्तन होईल. ४ नोव्हेंबर (वैकुंठ चतुर्दशी) रोजी
सकाळी ८ वाजता श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक होईल. रात्री ९.३० ते १ यावेळेत आरती, भोवत्या व हभप यश सोहनी यांचे कीर्तन होईल व तीर्थप्रासादाचे वाटप केले जाईल.
५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक होईल. दुपारी २ वाजता हभप विश्वनाथ भाट्ये यांचे कीर्तन होईल. त्यानंतर बाळगोपाळांचे खेळ, दहीकाला, भोवत्या व गंगास्नान होईल. सायंकाळी ७ ते ९ यावेळेत आरती, भोवत्या होतील. रात्री १०.३० वाजता मंगलाचरण,
रात्री ११ वाजता श्रीरंग रत्नागिरीची निर्मित असलेले “यू आर ग्रेट पप्पा” या दोन अंकी कॉमेडी नाटकाचे सादरीकरण होईल. याचे दिग्दर्शन भाग्येश खरे यांनी केले असून, यात पल्लवी गोडसे, सोनल शेवडे, सारा काळे, अथर्व करमरकर, चिन्मय दामले व गोपाळ जोशी हे कलाकार असतील. त्यानंतर हभप यश सोहनी यांचे लळीताचे कीर्तन होईल. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत श्रीसत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे वाटप केले जाईल.




