
अमीर खान अटकेत. चिपळूणमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई
चिपळूण : शहरातील काविळतळी परिसरात आज (सोमवार) सकाळी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या अमीर खान या व्यक्तीस उत्तर प्रदेश पोलिसांनी चिपळूणमधून ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीर खान (राहणार उत्तर प्रदेश) याच्यावर आर्थिक फसवणुकीचा मोठा गुन्हा दाखल असून, त्याच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक मागील काही दिवसांपासून प्रयत्नशील होते.
सदर आरोपी चिपळूणमध्ये असल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक सोमवारी चिपळूणमध्ये दाखल झाले. स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून त्यांनी काविळतळी परिसरात छापा टाकला आणि अमीर खानला अटक केली.
या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.




