
श्री देव विठ्ठल मंदिर सुशोभिकरण भूमिपूजन सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
आज रत्नागिरी येथील श्री देव विठ्ठल मंदिर सुशोभिकरण भूमिपूजन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले.
रत्नागिरीकरांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर परिसराचं सौंदर्य आणि धार्मिक पर्यटन या दोन्हींच्या विकासाला चालना देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.
महायुती सरकारच्या काळात रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
शिवसृष्टी, भारतरत्न शिल्प प्रकल्प, बहिरेबुवा व विश्वेश्वर मंदिर सुशोभिकरण, बौद्ध विहार, अंडरआर्म क्रिकेट स्टेडियम ते सेमीकंडक्टर प्रकल्प—या सर्व उपक्रमांमुळे रत्नागिरीचा नवा चेहरा घडत आहे.
हा कार्यक्रम केवळ एका मंदिराच्या सुशोभीकरणाचा नाही,
तर रत्नागिरीच्या अस्मितेचा आणि वारकरी परंपरेच्या जपणुकीचा उत्सव आहे.
रत्नागिरीच्या विकासाचा प्रत्येक टप्पा हा जनतेच्या आशीर्वादाने आणि सहभागाने पूर्ण होत आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत रत्नागिरीचा विकास करत राहू, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आ. मुन्नाशेठ सुर्वे, ट्रस्टचे अध्यक्ष आ. आनंद (नानासाहेब) मराठे, माजी नगराध्यक्ष अशोकजी मयेकर, प्रमोदजी, राहुलजी पंडित, विपीनजी साळवी, विजयजी पेडणेकर, राजनजी फाळके, सुदेशजी मयेकर, शिल्पाताई सुर्वे, मानसीताई करमरकर, वैभवजी खेडेकर, राजू तोडणकर, समीरजी तिवरेकर, यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




