
वादळाच्या इशार्यानंतर नौका किनार्यावर
कोकणसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून वादळी तडाखा दिला आहे. सलग काही दिवस पाऊस पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती उध्वस्त झाली आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वादळी वार्याचा इशारा मिळाल्यामुळे हर्णैतील मासेमारी नाकांनी किनारा गाठला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत हर्णै बंदरातील उलाढाल मंदावणार आहे.
हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला असून मासेमारी नौकांनी समुद्रात जावू नये, असा स्पष्ट इशारा मच्छिमारांना मिळाल्यामुळे हर्णै बंदरातील मच्छिमारांमध्ये घबराट निर्माण झाली असून बहुतेक मच्छिमारांनी आपल्या नौका किनार्यावर आणल्या आहेत. काही नौका आंजर्ला खाडीत उभ्या करण्यात आल्या आहेत. मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून वारंवार येणार्या वादळामुळे येथील मच्छिमार हैराण झाला आहे. दरम्यान ऐन दिवाळी हंगामात हर्णै बंदरातील लाखोंची उलाढाल थंडावणार आहे.www.konkantoday.com




