
रत्नागिरीतील उद्यान, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी गोवा शिपयार्ड कंपनीकडून रुपये २५ लाखाचा CSR मंजूर – ॲड.दीपक पटवर्धन
गोवा शिपयार्ड कंपनी ही शिप बिल्डिंग क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी असून संरक्षण मंत्रालया अंतर्गत काम करते. सप्टेंबर १९६७ साली GSL ची स्थापना झाली असून या ६० वर्षात ४०० पेक्षा अधिक शिप बांधण्याचे काम गोवा शिपयार्डने केले. यापैकी भारतीय नौदलासाठी ८२ शिप , सिमा सुरक्षा दलासाठी ३४ शिप, ४८ शिप निर्यात केली असून २३९ शिप ही इतर ग्राहकांसाठी तयार करून दिली आहेत. फ्रिगेट शिप, पॉल्युशन कंट्रोल शिप, फास्ट पेट्रोल व्हेसल्स आदी विविध प्रकारची व्हेसल्स गोवा शिपयार्डने तयार केली आहेत अशी माहिती गोवा शिपयार्ड कंपनीचे स्वतंत्र संचालक ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
प्रतिवर्षी कंपनी कायद्याला अनुसरून झालेल्या प्रत्यक्ष नफ्याच्या प्रमाणात कंपनी CSR खर्च करीत असते. या वर्षीच्या कंपनी CSR फंडातून रुपये १० लाख रत्नागिरी शहरातील जयस्तंभ नजीकच्या बागेचे सुशोभीकरण, आसन व्यवस्था, खेळणी यासाठी कंपनीने मंजूर केले असून जाकादेवी इथल्या विद्यालयासाठी ५ स्मार्ट पॅनल बोर्ड रुपये १० लाख किंमतीचे मंजूर केले आहेत. तर रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी ऑटो रिफ्रेक्टोमीटरसाठी रुपये ५ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
२०२१ पासून या कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून केंद्र शासनाने केलेल्या नियुक्तीनुसार काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. सन २०२१-२२ मध्ये कंपनीचे व्हॅल्यु ऑफ प्रोडक्शन ७०४ कोटी होते ते वाढून २०२४-२५ मध्ये २८०१ करोड झाले. कंपनीची नेट बर्थ २०२०-२१ मध्ये १०९८ करोड होती ती वाढून १६२० करोड झाली आहे. कंपनीची ऑडीट बुक पोझिशन १६१९३ करोड पर्यंत पोचली असून सन २०२१-२२ मध्ये १०१ करोड नफा होता तो सन २०२४ – २५ अखेर २८८ करोड इतका वाढला आहे. शिपयार्ड क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कंपनी म्हणून गोवा शिपयार्ड काम करत असून संरक्षण क्षेत्रातील या कंपनीमध्ये संचालक मंडळात काम करण्याचा हा अनुभव माझेसाठी खूप मौलिक आहे असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.



