
पोलीस ठाण्यासमोरील उभ्या डंपरमधून वाळू गायब.
दापोली तालुक्यातील देहेण येथील ग्रामस्थांनी पकडलेला अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पोलीस ठाण्यासमोर उभा असतानाच त्यातील वाळू गायब झाल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चक्क पोलीस ठाण्यासमोरच असा प्रकार घडल्याने खेद व्यक्त करण्यात येत आहे.येथील ग्रामस्थांनी सोमवारी रात्री डंपर पकडून महसूल विभागाकडे सुपूर्द केला होता. मात्र दुसर्याच दिवशी डंपर पोलीस ठाण्यासमोर उभा असताना त्यातील वाळूचा साठा गायब झाल्याचे दिसून आले. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चोरीच्या वाळूचीच पुन्हा चोरी झाली का? असा सवाल उपस्थित केला आहे.www.konkantoday.com



