
पुष्कर कंपनीत साहित्य चोरीस, एकावर गुन्हा
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसातीतील श्री पुष्कर केमिकल ऍण्ड फर्टीलायझर्स कंपनीतून साहित्य चोरल्याप्रकरणी दामोदर प्रसाद तिवारी (४१, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शरद तुकाराम भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दामोदर तिवारी या चालकाने एमएच ४३ बीएक्स ०८२७ क्रमांकाच्या टँकरचे लावलेले सील तोडून त्यातील १२ हजार ३२० रुपये किंमतीचे साहित्य चोरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही घटना १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.www.konkantoday.com




